नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला

मुंबई: राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला झाला आहे.

अशी माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करत दिली आहे.खोट्या व्हिसाप्रकरणी फराज मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलिस स्टेशनम मुंबई स्पेशल क्राईम ब्रॅंच २ यांच्याकडे बनावट व्हिसासंदर्भात प्रकरणं येतात. त्यांच्या तक्रारीवर कुर्ला पोलिसांच्या छाणणीमध्ये मलिक यांचे नाव आहे. त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फराज मलिक यांची दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचं नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात येत आहे.