संजय राऊत यांना या प्रकरणात दिलासा ; सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात संजय राऊत हे तब्बल 100 दिवस तुरुंगात होते.त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मात्र या जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. ईडीने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती.मात्र आज या प्रकरणावर सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

ईडीकडून तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्न पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र या जामिनाला ईडीने विरोध केला आहे. संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. मात्र न्यायमूर्ती नीतीन बोरकर काही कारणानं अनुपस्थित असल्यानं आजचं कामकाज तहकूब केले. संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार होती.मात्र न्यायमूर्ती नीतीन बोरकर काही कारणानं अनुपस्थित असल्यानं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दुसरीकडे संजय राऊत हे आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत.