प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतच्या तुटलेल्या युवतीवर असदुद्दीन ओवैसी यांचं भाष्य….

नाशिक : उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं म्हणत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने युती केली. पण काही दिवसांआधी ही युती तुटली. पण ही युती नेमकी का तुटली याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार चर्चा होत असते. त्यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलंय.

युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा मी कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. ती मी आता कसं सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.लव्ह जिहाद विरोधी कायद्यावरही ओवैसी बोललेत. भारताच्या संविधानानूसार आपल्या आवडीनुसार लग्न करू शकतात. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे तिथे हा बेकायदेशीर कायदा बनवण्यात आला आहे, असं म्हणत औवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे.