अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

नागपूर : महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठवली जाते. मात्र, आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारा बाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

राज्याचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात सीमावाद, भूखंड घोटाळे, विकासकामांना स्थगिती, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधानं यांमुळे विरोधकांनी सत्ताधार्यांची चांगलीच कोंडी करण्यात आली.यावेळी सत्ताधार्यांकडून देखील विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.अधिवेशनातही राज्य सरकारच्य़ा रखडलेल्या दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तावारावरुन देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टोलेबाजी केली होती. आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन भरत गोगावले यांना टोला देखील लगावला होता. शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशन संपल्यानंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे येत्या 26 जानेवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यांना हक्काचे पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासारख्या आमदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांचं हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लागलेले आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये राज्यातील दुसर्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. यावेळी अमित शाह यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार लवकरच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शाह यांनी नव्या विस्तारात किती मंत्र्यांना स्थान देणार याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाच्या वाट्याला किती आणि कोणते मंत्रिपदे येणार याचीही माहिती देण्यात आलेली नाही.शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना स्थान मिळणार का? तसेच मंत्रिमंडळ विस्तारासह महामंडळांचेही वाटप होणार का? याची माहितीही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. सध्या केवळ कॅबिनेट मंत्रीच आहेत, त्यामुळे अनेकांवर इतर विभागाचा पदभार आहे. राज्यमंत्री नसल्याने अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त मंत्रालयाचा पदभार आहे, तो कमी करण्यासाठी येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. मात्र, नव्या विस्तारात कोणाला किती मंत्रिपदे मिळतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.