कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा आनंद घेता येण्यासाठी “ड्रीम ११ अनप्लग” धोरण

दिल्ली: स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी स्टार्टअप ‘ड्रीम ११’ ने आपल्या कर्मचाऱ्यांना व्यत्ययमुक्त सुट्ट्यांचा आनंद घेता यावा, याासाठी “ड्रीम ११ अनप्लग” हे नवीन धोरण स्वीकारले आहे.

या धोरणांतर्गत, कंपनीचे कर्मचारी संपूर्ण आठवडाभर सर्व कार्यालयीन कामकाज, संबंधित संभाषणे (ईमेल, व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फोन कॉल) आणि सहकारी कर्मचाऱ्यांपासून स्वतःला पूर्णपणे ‘अनप्लग’ करू शकतात. म्हणजेच या कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब केले जाणार नाही. “अनप्लग” वेळेत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास संबंधित सहकाऱ्याला १२०० डॉलर (सुमारे १ लाख रुपये) दंड भरावा लागेल, असा इशाराही ड्रीम ११ चे सह-संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी कर्मचाऱ्यांना दिला असून हे आतापर्यंत प्रभावी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम ११ ने लिंक्डइन पोस्टद्वारे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अनप्लग धोरणाबद्दल सांगितले. ड्रीम ११ मध्ये, प्रत्यक्षात ‘ड्रीमस्टर’ ला लॉग ऑफ करतो. – कंपनीतील कोणीही मेहनतीने कमावलेल्या सुट्टीचा आनंद घेत असताना त्यांच्या संपर्कात राहू नये, यासाठी आम्ही हे करतो.- कारण, प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवणे किंवा सुट्टीवर पूर्णपणे आराम करणे यामुळे एकूण मूड, जीवनाची गुणवत्ता, सर्वसाधारणपणे उत्पादकता आणि बरेच काही वाढू शकते, असा आमचा विश्वास आहे.