केस धुतल्यावर तुटतात?

हेअर टिप्स ::केस धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर केसांना कोणत्या गोष्टी लावल्यानं केस गळणं थांबवता येईल ते समजून घेऊया. 

केस धुतल्यानंतर केसांना काय लावायचं?कंडीशनर लावाशॅम्पूने केस धुतल्यानंतर केस खूप कोरडे होतात आणि खराब होतात, कारण त्यात अनेक हानिकारक रसायने असतात. म्हणूनच केसांना हेअर मास्क किंवा कंडिशनर लावणे आवश्यक आहे. ते नुकसान कमी करतात आणि केसांमधील आर्द्रता लॉक करण्यात मदत करतात.हेअर सिरम लावाकेस धुतल्यानंतर जर तुम्ही कंडिशनर लावले नसेल तर केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका, कारण यामुळे केसांचे नुकसान वाढते आणि टाळू देखील कोरडी होते. केस कोरडे होऊ द्या आणि नंतर चांगले हेअर सीरम लावा, टाळूची मालिश करा आणि कंगव्याने केस व्यवस्थित विंचरा.केस धुतल्यानंतर लगेच बांधू नकाकेस ओले असताना कधीही बांधू नका. पूर्ण कोरडे झाल्यावर बांधा. ओले केस लवकर तुटतात. याशिवाय केस बांधण्यासाठी नेहमी सैल किंवा जास्त स्ट्रेचेबल हेअर इलास्टिक बँड वापरावा लागतो. नेहमी स्कार्फ किंवा झाकलेला स्नॅग-फ्री इलास्टिक बँड वापरा.कंगव्याचा वापरजेव्हा तुमचे केस पूर्णपणे कोरडे असतात तेव्हा ते सोडवण्यासाठी नेहमी रुंद कंगवा वापरा, बारीक कंगवा वापरल्याने केस तुटू शकतात.