भुये ग्रामपंचायतीत सत्तातंर : लोकनियुक्त सरपंचपदी श्रीमती मालिनी पाटील- भुयेकर

शिये वार्ताहर भुये (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीत सत्तातंर घडवत श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच पदासह पाच जागेवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले. भुये ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी उपसरपंच भारत पाटील- भुयेकर, प्रदिप पाटील-भुयेकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विक्रम पाटील यांनी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातुन लोकनियुक्त सरपंच पदासाठी पंचायत समिती सदस्या श्रीमती मालिनी पाटील- भुयेकर यांच्या सह नवीन चेहऱ्यांना संधी देत माजी जि.प.सदस्य अमर नाईक,माजी सरपंच अभिजीत पाटील यांच्या सत्ताधारी आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले होते.अटीतटीच्या लढतीत श्रीमती मालिनी पाटील – भुयेकर यांनी सौ.सविता पाटील यांचा ४७ मतांनी पराभव करून सरपंच पदावर नाव कोरले.

तर पाच सदस्य निवडून आल्याने सत्तातंर झाले.श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते: सौ.मेघा शिंदे(३३८),सौ.संगिता पाटील (३४२),आश्लेश खाडे (३५२), कुलदीप पाटील (३४४),सौ.साक्षी पाटील (३४३) विरोधी राजर्षी शाहू ग्रामविकास आघाडी : अभिजीत बाबासाहेब पाटील (३३६), कृष्णात चौगले (३७१), सौ. विमल पाटील,(३७८),सौ.प्रेमला शिंदे (३७८) असे आहेत.