ग्रामपंचायत निवडणूक काळात ठिकठिकाणी अवैद्य दारूसाठ्यांवर धाडी….

लातूर : जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणूक काळात परराज्यातून चाेरट्या मार्गाने आणण्यात येणाऱ्या दारुसाठ्याच्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लातूर, उदगीर आणि औसा तालुक्यात धाडी मारण्यात आल्या.

दरम्यान, यावेळी लाखाे रुपयांचा भेसळयुक्त अवैध दारुससाठा पथकाने जप्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या धाडीत औसा तालुक्यातील देवताळा येथे १६ डिसेंबरराेजी गाेवा राज्य निर्मित दारुसाठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने देवताळा येथे छापा मारला. यावेळी गाेवा राज्य निर्मित विदेशी दारुचे ३० बाॅक्स (किंमत २ लाख ३१ हजार ८४० रुपये) जप्त करण्यात आला असून, आराेपी फरार झाले आहेत. त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.