कदमवाडी, भोसलेवाडी परिसरात आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून ८० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : ”आम्ही केवळ आश्वासने देत नाही, आम्ही शब्द देतो आणि तो पाळतोही. विधानसभा पोट निवडणुकीत येथील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आहोत. लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करत आहोत. विकासकामांच्या आड कधीही येत नाही. मात्र, काहीजण आम्ही केलेल्या विकास कामाचे उद्घाटन करत आहेत हा प्रकार निषेधार्थ आहे” असे मत माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार जयश्री जाधव यांच्या आमदार निधीतून कदमवाडी, भोसलेवाडी आणि कपूर वसाहत परिसरात ८० लाख रूपयांच्या रस्ते आणि गटर्सच्या कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

कोल्हापूर शहरातील विविध प्रश्न, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. विकास कामांना मंजुरी मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवरती पाठपुरावा करत आहे. जनतेची सर्व विकासकाम पूर्णत्वास नेली जातील अशी ग्वाही आमदार जयश्री जाधव यांनी दिली.आमदार सतेज पाटील म्हणाले, आपण स्वतः, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्रीताई जाधव असे एकत्रित मिळून कोल्हापूर शहरातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत, तसच नव्यानही विकासकामं सुरू आहेत. आम्ही नेहमी जनतेला सर्व प्रकारची मदत करण्याचच काम करतोय, विकास कामांच्या आडवे येत नाही.

आम्ही केलेल्या विकास कामांचं उद्घाटन काही लोक करत असून, त्यांचा हा प्रकार निषेधार्ह आहे. काही लोकांच्या हट्टामुळ उत्तरची पोटनिवडणूक लागली. यामध्ये स्वाभिमानी जनतेने ४०० रूपयांच सिलेंडर १ हजार रुपये करणाऱ्यांना घरी बसवण्याचं काम केले. या जनतेच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आम्ही जनतेला जो शब्द दिला, त्याला जागून आमदार जयश्रीताई जाधव यांनी विकासकामं केली आहेत. यापुढेही सर्व विकासकामे प्रामाणिकपणे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली .या रस्ते आणि गटर्सच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये कपूर वसाहत येथील गटर्सच काम, कदमवाडी चौकातील रस्त्याच काम, साळोखे मळा येथील रस्ते आणि गटर्सचं काम आणि भोसलेवाडी येथील व्यायाम शाळा रोडवरील रस्ते आणि गटर्स कामांचा यात समावेश आहे. आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्रीताई जाधव यांनी विकासकामांचा डोंगर रचला असून, या परिसरातील विकासाचा खरा सुर्य आज उगवला, असे मत माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी व्यक्त केले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी महापौर भीमराव पोवार, भरत रसाळे, दिपक शेळके, अरविंद मेढे, विक्रमसिंह घाटगे, माजी नगरसेविका रेखा आवळे, मीनाताई शेजवळ, निलेश भोसले, अजित घुरके, अमोल शेंडगे, प्रमोद ऐवाळे, शिवाजीराव संकपाळ, संतोष कणसे, सत्यजित शेजवळ यांच्यासह महिला आणि नागरिक मोठया संख्येन उपस्थित होते .