औरंगाबादचे नाव छ. संभाजीनगर करण्यास लवकरच मंजुरी

औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराची मागणी होत आहे. दरम्यान आता या मागणीला लवकरच यश येणार असून, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे.

औरंगाबादच्या जयभवानीनगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलतांना भागवत कराड म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश मिळणार आहे.