छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानात! मुस्लिम बांधवही मैदानात

पूणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं असून अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात येत आहे. या बंदमध्ये मुस्लीम समुदाय देखील मैदानात उतरला आहे

पुण्यातील पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने 13 तारखेला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्या अगोदर 10 डिसेंबर रोजी भव्य सन्मान यात्रा निघणार आहे. या बंदला आता पुण्यातील मुस्लीम संघटना देखील पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत पुण्यातील एसएसपीएमएस येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली.बैठकीनंतर जमीयत ए उलेमा हिंद संघटनेचे अंजुम इनामदार म्हणाले की, मुस्लीम सर्व मुस्लीम संघटनांनी ‘शिवाजी महाराज के सम्मान में मुसलमान मैदान में’चा निर्धार केला आहे. वारंवार शिवाजी महाराजांचा अवमान होत आहे. या अवमानाविरोधात मुस्लीम समाजाने पुढं येणे गरजेचे आहे. याआधी राज ठाकरे यांनी म्हटलं होत की, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की, मुस्लीम मत देत नाही. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुण्यातील बंदमध्ये मुस्लीम सहभागी होणार आहेत. पुण्यातील ३०० हून अधिक मशिदींमध्ये १३ तारखेंच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचही मुस्लीम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.