मुंबई उद्या महारोजगार मेळाव्याचे आयोजन…

मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे मेळाव्यास सुरुवात होईल.