चीनचा अमेरिकेला गंभीर इशारा…

दिल्ली : चीनच्या लष्कराच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेच्या युद्धनौकेने मंगळवारी दक्षिण चीन समुद्रात त्यांच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. पीएलएच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन युद्धनौका स्प्रेटली बेटांजवळ दिसली.यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यात आली. ही युद्धनौका मार्गदर्शित क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होती. अमेरिकेच्या या कारवाईला चीनच्या सीमेत घुसखोरी असे चीनने म्हटले आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते तियान जुनली म्हणाले, की अमेरिकन सैन्याने या कारवाईने चीनच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. दक्षिण चीन समुद्रावर अमेरिका आणि चीन अनेकदा आमनेसामने आले आहेत. जिथे चीन या भागाचे आपले सीमावर्ती क्षेत्र म्हणून वर्णन करतो, अमेरिकेचे मत आहे की हे एक आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहे, जिथे कोणीही कधीही येऊ शकते आणि जाऊ शकते.विशेष म्हणजे, दक्षिण चीन समुद्रात मौल्यवान खनिजांसह नैसर्गिक वायूचा प्रचंड साठा आहे. त्यामुळे चीन हा भाग आंतरराष्ट्रीय जलक्षेत्राचा भाग मानत नाही. त्याच वेळी, समुद्रमार्गे जगातील 80 टक्क्यांहून अधिक व्यापार देखील याच प्रदेशातून होतो. यामुळेच अमेरिकेला या प्रदेशात अखंडित हालचाल हवी आहे. दक्षिण चीन समुद्र क्षेत्रावर इतर अनेक दावेदार आहेत ज्यावर चीन आपला हक्क सांगतो. परंतु, ते सर्व ताकदीच्या बाबतीत चीनपेक्षा खूप कमकुवत आहेत.या क्षेत्रात चीन आणि अमेरिका अनेकदा आमनेसामने आले आहेत. चीनने या भागात अनेक अनैसर्गिक बेटे बांधली आहेत. या बेटांवर चीनने लष्करी तळ बांधल्याचे अमेरिकेने नुकतेच सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून उघड केले होते. चीनने यापैकी अनेक बेटांवर हवाई पट्ट्या आणि क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत.