…………..पंचवीस वर्षात कागल मधील झोपडपट्टी नियमितीकरण का झाले नाही? मुश्रीफसाहेब उत्तर द्या?: राजे समरजीतसिंह घाटगे

कागल येथे शाहू काॕलनीमध्ये जाहीर कार्यक्रमात बोलताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे….

कागल : कागलमधील झोपडपट्टी वासीयांना आमच्या पूर्वजांनी जमीनी दिल्या.त्यांनी त्यावर घरेही बांधली. पण मागील 25 वर्षात तुम्ही आमदार, मंत्री व सत्तेत आहात. पण ही घरे त्यांच्या नावावर अद्यापही का झाली नाहीत याचे उत्तर द्या. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना केले.

कागल येथे शाहू काॕलनीमध्ये जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. घाटगे पुढे म्हणाले कागलमधील झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न आम्ही 2018 साली युती सरकारच्या काळात हाती घेतला होता.त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. या विषयाला गती मिळाली होती. मात्र दुर्दैवाने सरकार बदलले. पुन्हा तुमचे आघाडी सरकार सत्तेत आले.तरीही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. कागलच्या या झोपडपट्टी वासियांचे प्रश्न आम्ही सोडवणार असा डांगोरा आपन पिटत आहात. मग मागील अडीच वर्षे आघाडी सरकार सत्तेवर आले असताना ते का सोडवले नाहीत? याचे स्पष्टीकरण लोकांना द्या. असेही ते म्हणाले आमदार हसन मुश्रीफसाहेब् आम्ही कागलला आदर्श मॉडेल बनवले म्हणतात, यावर गजानन माने म्हणाले तीस वर्षांपूर्वी स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या कारकीर्दीत झालेली रस्त्याची व इतर सर्वच कामे दर्जेदार होती. मात्र आता आमदारांच्या निधीतून सहा महिन्यापूर्वी झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. याशिवाय त्यांनी बांधलेला स्विमिंग टॅंक बंद पडला आहे. शाहू स्टेडियमचा तर अड्डाच केला आहे यालाच आदर्श कागल म्हणायचे का?

यावेळी राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, नगरसेविका आनंदी मोकाशी, हिदायत नायकवडी, श्रीकांत सूर्यवंशी, शिवाजी निकम,न लखन गोसावी, विक्रम गोसावीआदी उपस्थित होते. यावेळी गजानन माने, सचिन मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत राजू कोरवी यांनी केले प्रास्तविक सुशांत कालेकर यांनी केले आभार संजय घाटगे यांनी मांनले.