आम्ही उद्धव ठाकरे सारखे बहुरूपी चेहऱ्याचे नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अप्रत्यक्ष टीका

मुंबई: काही लोकांना एका चेहऱ्यात अनेक चेहरे दाखविण्याची सवय असते. बोलतात एक आणि करतात दुसरच. परंतु, शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांनी आमच्यावर कधीच असे संस्कार केले नाहीत. त्यांनी रोखठोक बाण्याचे संस्कार आमच्यावर केलेआमचा चेहरा एकच आहे. जे बोलतो तेच करतो, असे विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

डोंबिवलीतील नांदिवलीतील जाहीर सभेत ते बोलत होते.काही लोक एका चेहऱ्यातून अनेक चेहऱ्यांचे रंग दाखवितात. त्या चेहऱ्यांप्रमाणे ते रंग बदलत राहतात. शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांनी अशा बुहचेहऱ्याचे संस्कार आमच्यावर कधीच केले नाहीत. आम्ही जे बोलतो ते करतो. करुन दाखवितो. झटपट कार्यक्रम करतो. आम्ही कधी शब्द फिरवत नाही. आहे ते करुन दाखवितो आणि दाखविले, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

स्वार्थ नसानसात घुसला की पुढचे काही दिसत नाही. भूमिका बदलण्याची हिम्मत होत नाही. भूमिका बदलून पक्ष, संघटना वाढवावी अशी बुध्दी सूचत नाही. भूमिका बदला म्हणून त्यांना मी स्वता, गजाजन किर्तीकर यांनी किती वेळा सांगितले. कधी कोणाचे ऐकले नाही. भूमिका बदलली तर पक्ष, संघटना वाढते. हे साधे सूत्र. ते कधी स्वार्थामुळे समजून घेतले नाही. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे नेण्यासाठी भूमिका बदलणे गरजेचे असल्याने संघटनेच्या अस्तित्वासाठी आम्ही भूमिका बदलली आणि तडकाफडकी निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.