साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी सापडल्या…

सातारा : साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत.

या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून केलं जात आहे. दरम्यान, इतिहास अभ्यासक द. बा. पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे. त्यामुळे या तीन कबरी नक्की कोणाच्या हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरून हटवण्यात आलं आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली.