प्रतापगडा पाठोपाठ संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमण ही हटवलं

पुणे : पुण्यातल्या चाकणजवळच्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरचं अतिक्रमण आज हटवण्यात आलं आहे. पुण्यातील चाकण जवळ हा संग्राम दुर्ग किल्ला असून पुरातत्व विभागाने पोलिसांच्या मदतीने येथील बांधकाम हटवल आहे.

किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून चार वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र हे बांधकाम हटवलं जात नव्हतं. बुधवारी अखेर पोलिसांच्या मदतीने या किल्ल्यावर पत्राशेड टाकण्यात आलं होतं. हे किल्ल्याच्या वास्तूला बाधा पोहचवली जात होती. किल्ले संरक्षणासाठी काम करणाऱ्या काही संघटनांनी याविषयी तक्रार दिली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाने ही कारवाई केली आहे.