हिंगोली येथे भारत जोडो यात्रा नियोजन बैठक

हिंगोली (प्रतिनिधी) : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हिंगोली येथे या पदयात्रेमध्ये येत्या (शनिवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासनाबरोबर नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. कोल्हापुरातून दहा हजार कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार असून आ.सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांची भोजन व राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भारत जोडो यात्रेत मध्ये हजारो नागरिक सहभाग होत आहेत. हिंगोली मधील यात्रेबाबात जिल्हा प्रशासनासोबत कायदा सुव्यवस्था, पार्कींग, विविध विभागाकडून सर्व सेवा याबाबत चर्चा झाली. यावेळी आ.वर्षा गायकवाड, आ.प्रज्ञा सातव,आमदार जयंत आसगावकर,मा.आ. भाऊराव पाटील, सत्यजित तांबे,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस प्रमुख जी.श्रीधर, जिल्हा परिषद मुख्याधिकारी संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,शहर डीवायएसपी यतीश देशमुख उपस्थित होते.