खुपिरेत आ.पी.एन.पाटील फंडातून विकासकामांचे उदघाटन

दोनवडे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता.करवीर) येथे आमदार पी.एन.पाटील यांच्या २५/१५ फंडातून तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नागरी सुविधा योजनेतून मंजूर विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते हे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी सरपंच दिपाली जांभळे, उपसरपंच सागर पाटील, आनंदराव पाटील, सर्जेराव जोती पाटील, आकाराम पाटील, तानाजी गवळी, युवराज पाटील, दत्तात्रय पाटील, सनी पाटील, सरदार बंगे, एस. डी. पाटील, रविराज पाटील, विलास चौगुले, भगवान हराळे, सर्जेराव हुजरे, हिंदुराव पाटील आदी उपस्थित होते.