डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय एकता दिन

कसबा बावडा (प्रतिनिधी) : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज (सोमवारी) कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी सरदार पटेल यांना अभिवादन करून त्यांचा जीवन प्रवासावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.अनिल कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. पटेल यांची देशाची एकात्मता टिकवण्यासाठी दिलेल्या योगदानाबाबत माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

‘सरदार पटेल – द आर्कीटेक्ट ऑफ युनिफीकेशन’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते सादर केली. राष्ट्राची सुरक्षितता, एकता व अखंडता राखण्यासाठी सरदार पटेल यानी दिलेले योगदान, त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग यांचे दर्शन या प्रदर्शनातून घडवण्यात आले.

 महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे (एन.एस.एस) या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. राहुल पाटील, एन.एस.एस विभागाचे समन्वयक प्रा. योगेश चौगुले, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.