लक्ष्मी फाउंडेशनने केली ‘त्यांची’ दीपावली गोड  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य साधून गर्जन (ता.करवीर) येथील लक्ष्मी फाउंडेशनने निराधार महिलांना साड्या,आकाशकंदील, फराळ तसेच अन्नधान्य आदी साहित्य दिले.

अवनी या सामाजिक संस्थेशी संबंधित असणाऱ्या एकटी या स्वयंसेवी संस्थेमधील आपल्या घरी दीपावली जशी साजरी होते,त्याचप्रमाणे यांच्याही दीपावली तशीच साजरी व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनायक भीमराव देसाई,प्रदीप बनाजीराव देसाई, सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास विभाग सम्राट नरहर पोतदार, जिल्हा व्यवस्थापक एमएसआरएलएम तसेच राजेंद्र माने,अधीक्षक आदिवासी विकास सतीश आवटे,  अशितोष देसाई आदी उपस्थित होते.सदर उपक्रमास अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे अध्यक्ष विनायक देसाई यांनी आभार मानले.