कोल्हापूर विमानतळ विस्तारीत धावपट्टीला मान्यता : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लवकरच रात्रीची विमान सेवा सुरू होणार, कोल्हापूरच्या व्यापार-उद्योग आणि पर्यटनाला मिळणार चालना मिळणार आहे.आता कोल्हापूर विमानतळ रात्री सुध्दा सुरू राहणार आहे. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडींग आणि विस्तारीत धावपट्टीला, नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

कोल्हापूरच्या विकासाच्या वाटेवरचा माईल स्टोन यानिमित्ताने उभारला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून कोल्हापूरसाठी दोन महत्वाच्या योजनांना मंजुरी मिळवली आहे. त्यानुसार कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींग सुविधेला मंजुरी मिळाली. तसेच कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी, १३७० मीटरवरून १९३० मीटर इतकी विस्तारीत झाली आहे. त्यामुळे आता एअर बस सारखी मोठी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकतील. या विस्तारीत धावपट्टीलाही आज भारतीय नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मान्यता दिली.
त्यामुळं प्रदिर्घकाळ चर्चेत असलेले आणि रेंगाळलेले कोल्हापूर विमानतळाचे प्रश्‍न मार्गी लागले आहेत.
गेल्याच आठवड्यात खासदार महाडिक यांनी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांची भेट घेवून, त्यांना कोल्हापूर विमानतळाच्या गरजांची माहिती दिली होती. त्यावेळी सिंदीया यांनी, महाडिक यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. कोल्हापूर विमानतळावरील ऍपरन आणि टॅक्सी वे तसंच आयसोलेशन वे उभारण्यास तत्काळ मंजुरी दिली होती. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक, नाईट लँडींग आणि विस्तारीत धावपट्टीला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोल्हापूरच्या विमानतळाचे प्रश्‍न सुटावेत, यासाठी प्रयत्न केले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही खासदार महाडिक यांना, या प्रश्‍नाच्या सोडवणूकीसाठी दिशा दाखवली. या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या सकारात्मकतेमुळे कोल्हापूरचा महत्वाचा विषय मार्गी लागला. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. लवकरच कोल्हापूर – मुंबई दैनंदिन विमानसेवेसह, अन्य मार्गांवर विमान उड्डाण सुरू व्हावे, रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, कोल्हापूर विमानतळाची नवी इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्निशल असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.