पंकजा मुंडेंनी केल्या ‘या’ शब्दांत भावना व्यक्त !

419

बीड (प्रतिनिधी)  : विधान परिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी मिळणार असं होतं. भाजपच्या संभाव्य यादीमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा देखील होती. पण काल भाजपकडून चार अंतिम नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नावचं नव्हतं. विधानपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारली गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे यांनी भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पंकजा मुंडेंना कदाचित याची कल्पना होती का याची चर्चा होऊ लागली आहे.

पंकजा मुंडे यांचे ट्वीट : 

आईंना..ताईंना फोन करुन दु:ख व्यक्त करतायत. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ‘तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशीर्वाद.

या विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने केवळ पंकजा मुंडे यांना डावलले असे नाही, तर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गजांना बाजूला सारत नवे चेहरे समोर आणले.