रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडणार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हयातील जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे हाती न घ्यावी लागावी म्हणून कौटुंबिक कारणे दिल्याने उद्धव ठाकरेंच्या सोबत काम करण्यास शिवसैनिक तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. माजी मंत्री उदय सामंत यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र शिवसेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात एक जिल्हाप्रमुख न भेटण्याची नामुष्की ओढावल्यांने शिंदे गटाचे शिवसेनेत वाढणारे प्रस्थ उद्धव ठाकरेंना धक्का मानला जात आहे.

काही राजीनामे उद्य सामंत यांच्या समर्थकांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र यानंतर शिवसेनेच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून नव्या नियुक्ता करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनी ही काही तासातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत रोज संघटनात्मक बैठका घेतात. असे असले तरी शिवसेनेतील गळती मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. गळती थांगबविण्यासाठीची वेळ निघून गेली आहे, की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिवसेनेकडून बंडखोरांची हकालपट्टी करत नव्या नियुक्ता करण्यात येत आहे.