विधान परिषदेसाठी सेनेकडून उद्धव ठाकरेंसह ‘हे’ नाव निश्चित..!

298

मुंबई (प्रतिनिधी) :  निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधान परिषदेचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाण्याच्या तयारीत आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरू झाली आहे. शिवसेनेकडून उद्धव  ठाकरे आणि प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांची नावं विधान परिषदेसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्या (मंगळवारी) उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.