‘त्या’ योद्ध्यांना सैन्य दलाकडून मानवंदना…!

0
53

मुंबई (प्रतिनिधी) : तिन्ही सैन्य दलाकडून आज (रविवारी) कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली. कोरोनाच्या या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयीन कर्मचारी, पोलीस, शासानाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी कोरोनाविरोधात लढत आहेत. नागरिकांची सेवा करणाऱ्या या योद्ध्यांच्या शौर्याला तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात आली.

भारतीय वायू सेनेतर्फे फ्लाय पास्टचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात आले. यामध्ये भारताची अत्याधुनिक लढाऊ विमाने व वाहतूक विमानांचा समावेश होता. भारतीय नौदलांकडून या योद्ध्यांना समुद्रातूनही सलामी देण्यात येणार आहे. २४ बंदरांवरील जहाजांवर संध्याकाळी सात वाजता विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here