खूशखबर ! घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त

0
349

मुंबई (प्रतीनिधी) : देशात लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच आहेत. या लॉकडाऊनमध्ये महिला तसेच सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. देशातील तेल विपणन कंपनीनं (HPCL, BPCL,IOC) विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. १४.२ किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर १६२. ५ रुपयांनी स्वस्त झाला आहेत. त्याच वेळी १९ किलो वजनाचा सिलिंडर २५६ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आधीच लॉकडाऊनमध्ये इंधन आणि भाज्यांचे दर वाढत असताना सिलिंडर स्वस्त झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. आयओसी दिलेल्या माहितीनुसार14.2 किलोग्रॅम सिलिंडरचा दर दिल्लीमध्ये ५८१, कोलकाता ५८४.५०, मुंबईत ५७९.00 तर चैन्नईत ५६९.५० रुपये झाला  आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here