बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत ५० कोटी ? हे खरे आहे का ?

मुंबई : बंडखोर आमदारांच्या घोडेबाजाराची किंमत ५० कोटी हे खरे आहे का ? कुणी दिले ? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.

शिवसेना बंडखोर आमदारांचे सुरत आणि गुवाहाटी येथील हॉटेलची बिले कोण भरत आहेत?, स्पाईस जेट विमानाचे बिल कुणी भरले? असे अनेक प्रश्न महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत. याठिकाणी आयकर विभाग आणि ईडीने छापे टाकल्यास काळ्या पैशाचे स्तोत्र उघडकीस येईल असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.