शाहू छत्रपती फौंडेशनचे राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : शाहू छत्रपती फौंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वीस शिक्षकांच्या नावांची घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्रूझ यांनी पत्रकार परिषदेत केली.        

पंधरा शिक्षकाना राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर पाचजनांना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्काराने गौरवले जाणार आहे. दि. २ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन बहुउद्देशीय सभागृहात संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. जॉर्ज क्रुझ आणि सचिव जावेद मुल्ला यानी पत्रकार बैठकीत दिली. मानपत्र, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि कोल्हापुरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी तानाजी शंकर कांबळे (कल्लेश्वर हायस्कूल, कसबा बीड), रमेश पांडुरंग वारके (बोरवड़े विद्यामंदिर बोरवड़े), दीपक मधुकर शेटे (आदर्श विद्यानिकेतन, मिणचे), सौ. सुस्मिता राजकुमार शिंदे (नरंदे हायस्कूल, नरंदे), विकास यशवंत समुद्रे (केपीसी हायस्कूल, बोरपाडळे), दत्तात्रय दादू पाटील (विद्यामंदिर नागाव), पूनम बाळासाहेब भोपले (विद्यामंदिर यादववाड़ी, ता. करवीर), उस्मान हबीब मुकादम( मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, कोल्हापूर), माधुरी अनिल मातले (महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी), प्रमोद गणपतराव कांबळे (दि न्यू हायस्कूल यड्राव), बाजीराव पांडुरंग पाटील (विद्यामंदिर सरवड़े), सुजाता रविन्द्र देसाई (गुरूदेव विद्यानिकेतन), राजेन्द्र हिंदूराव तौंदकर (विद्यामंदिर वाकरे), बाळासाहेब बळीराम पाटील (वारणा विद्यानिकेतन, नवे), साताप्पा दत्तात्रय कासार (श्रीराम विद्यालय, राजारामपुरी), यांचा समावेश आहे.

राज्यात पहिल्यांदा विधवा बंदीचा ठराव करणाऱ्या ग्रामपंचायत हेरवाडसह प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राचे निवृत्त अधिकारी डॉ. जे. पी. पाटील, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रमोद शहाजी पांडव, कड़गाव (ता.भुदरगड) येथील वजीर गफूर मकानदार, आणि डॉ संजय चोपड़े याना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. जॉर्ज क्रुझ यांनी दिली.  या पत्रकार बैठकीस फाउंडेशनचे संचालक नवाब शेख, डॉ. बी. के. कांबळे, दीपक बिडकर, निसार मुजावर, महेश धींग, चंद्रकांत कांडेकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.