हनुमान जन्मस्थळाची लढाई मुद्द्यावरून गुद्द्यावर

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाचा वाद पेटलेला असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्रार्थ सभेतमध्ये  अभूतपूर्व राडा झाला. पोलिसांनी महंतांना सभेतून बाहेर काढले. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे.

दोन्हीही बाजूच्या साधू महंतांमध्ये हमरीतुमरी झाली. वादाचे पर्यवसान टाळण्यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महंतांना घटनास्थळावरून सुरक्षित स्थळी नेले. यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांनी कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्यावर रोष व्यक्त केला. तसेच गोविंदानंद सरस्वती यांनीदेखील आक्रमक पावित्रा घेतल्यामुळे याठिकाणी मोठा तणाव झाला. श्री अनिकेतशास्त्री देशपांडे (महंत) यांच्या महर्षी पंचायतन सिद्धपीठम् नाशिकरोड येथील आश्रमात हनुमान जन्मभूमीवर शास्त्रोक्त चर्चा आज आयोजित करण्यात आली होती.