गडहिंग्लज मधील खाजगी डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप ; ना.हसन मुश्रीफ फाऊंडेशन व गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपक्रम…!

0
78

गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोरोना संसर्गाच्या खबरदारीचा उपाय म्हणून गडहिंग्लज शहरातील खाजगी डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप केले. नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

कोरोना संसर्गाच्या धास्तीने बहुतांशी खाजगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण व इतर सेवा बंद ठेवल्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अश्या डॉक्टर व दवाखान्यानी रुग्णसेवा अखंडित सुरू ठेवावी, असे आवाहन केले होते. वैद्यकीय सेवा ही ईश्वर सेवा आहे, या भावनेतूनच ती नियमित सुरू रहावी, म्हणून डॉक्टरांच्याही सुरक्षेच्या खबरदारी व उपाययोजना म्हणून या किटचे वाटप करीत आहोत

यावेळी जिल्हापरिषद उपध्यक्ष सतीश पाटील,माजी उपनगराध्यक्ष किरण कदम,उदय जोशी,शहर अध्यक्ष सिध्दार्थ बन्ने,माजी नगराध्यक्ष वसंतराव यमगेकर,माजी नगरसेवक सुरेश कोळकी, डॉ. सेल जिल्हा उपाध्यक्ष डॉ.किरण खोराटे,युवक शहर अध्यक्ष रामगोंडा पाटील,युवक जिल्हाउपाध्यक्ष महेश सलवादे,जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण राजू पाटील,अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब घुगरी,आण्णासाहेब देवगोंडा,गडहिंग्लज शहर उपाध्यक्ष रामगोंडा पाटील,अमर मांगले,संतोष कांबळे,उदय परीट,विजय बनगे,अवधूत रोटे, आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here