रिषभ संस्कृती परिवाराच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने महावीर जयंती साजरी

0
149

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊन मुळे जैन धर्मीयांचा  महावीर जयंती उत्सव यावर्षी स्थगित करण्यात आला आहे. परंतु भगवान महावीरांनी दिलेल्या “जिओ और जिने दो”, ” अहिंसा परमो धर्म”,  “मुक्या  प्राण्यावर दया करा” आदि  संदेशानुसार रिषभ संस्कृती परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

कोल्हापूरात भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना कुत्र्यांना आवश्यक अशा  विटा मारी बिस्किटांचे वितरण करण्यात आले. शहराच्या विविध भागात  उन्हात लॉक डाऊनचा  बंदोबस्त करणाऱ्या पोलिस बांधवांना ताक  वाटप करून त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. हातावर पोट असलेल्या काही व्यक्तीना अंदाजे पंधरा दिवस पुरेल इतके राशन देऊन त्यांच्या संसाराला हातभार  लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.  सीपीआर हॉस्पिटल मधील पेशंट हे  इतर दवाखान्यात हलवले  आहेत त्या पेशंटच्या  नातेवाईकांना भर उन्हात दवाखान्याच्या बाहेर दिवसभर बसून राहावे लागते अशा नातेवाईकांना पाण्याच्या बाटल्यांचे  वाटप मानवतेच्या दृष्टीने करण्यात आले.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी रिषभ संस्कृती  अपार्टमेंटमधील सुरेश महादेविया, जयेश ओसवाल, ओमनारायण मिश्रा, नरेश सुराणा, दीपेश शहा, रुपेन शहा, राजीव शहा, जितेंद्र मिश्रा, जय रायगांधी, प्रताप लोहार, हिरालाल लोहार, यांच्यासह  त्यांच्या कुटुंबीयांचे योगदान मिळाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here