विलगीकरण केलेल्या ठिकाणास आयुक्तांची भेट…!

0
42

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्यावतीने शहरामध्ये पाच ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. याठिकाणी मुंबई, पुणे, कर्नाटकासह परजिल्हयातून आलेल्या नागरीकांना या कक्षात ठेवण्यात आलेले आहे. या विलगीकरणाच्या ठिकाणी चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज (सोमवारी) आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षास भेट दिली.

विलगीकरण कक्षातील होम कोरंटाईन केलेल्या 18 नागरीकांना त्यांचा 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाल्यामुळे सोडण्यात आले. त्यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी हे या ठिकाणी उपस्थित होते. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेबद्दल आयुक्तचे व प्रशासनाचे या लोकानी आभार मानले.

यानंतर आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आयसोलेशन हॉस्पिटल येथे आय सि. यू ची पहाणी केली. त्या ठिकानी  असलेल्या दोन व्हेटीलेटरची पहाणी केली. तसेच मधल्या इमारतीचे काम लवकारात लवकर करण्याच्या सुचना शहर अभियंता नेत्रदिपक सरनोबत यांना दिल्या. यावेळी साथरोग अधिकारी डॉ.रमेश जाधव, डॉ.अमोल माने, डॉ.विद्या काळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here