खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात…!

0
94

मुंबई (प्रतिनिधी ) : कोरोनामुळे देशाला मोठ्या आर्थिक बळाची गरज आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व खासदाराच्या पगारात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. पुढच्या एक वर्षासाठी ही पगार कपात राहणार आहे. तर, दोन वर्षे खासदार निधीचे पैसेही मिळणार नाहीत.

कोरोना संकटाशी लढण्यासाठी याअगोदरच पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी १५ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. सोबतच पीएम केअर फंडाची स्थापनही करण्यात आली आहे.खासदारांचा एकूण पगार एक लाख ९० हजार रुपये आहे. त्यातले एक लाख रुपये वेतन, ७० हजार रुपये मतदार संघ भत्ता आणि २०  हजार रुपये ऑफिस भत्ता. यातले साधारण ६३ हजार रुपये कट होणार आहे. तर, खासदार निधी वर्षाला पाच कोटी रुपये मिळतो. दोन वर्षाचे दहा कोटी होतात.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here