एक दिवा संविधानाचा आणि ज्ञानाचा लावून आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा : शरद पवार

0
138

मुंबई (प्रतिनिधी ) : शरद पवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून फुले जयंती आणि ‘एक दिवा संविधानासाठी’ लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी केलं. दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात जे घडलं ते महाराष्ट्रात घडू नये यासाठी शरद पवार यांनी हे आवाहन केलं.

आणखी आठ दिवस सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. काळजी घेतली तर आपण निश्चितच कोरोनावर मात करु. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करत आहेत. सगळ्या जातीधर्मांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.

येत्या काही दिवसात शब ए बारात, महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंती आहे. परंतु यंदा जयंती उत्सवात गर्दी करु नका असं आवाहन शरद पवार यांनी केवं आहे. ते म्हणाले की, “आज महावीर जयंती आहे. मला खात्री आहे की संबंधित नागरिक कोरोनाची परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह घरातच भगवान महावीरांबद्दल आदर व्यक्त करत असतील. असाच कार्यक्रम ८ एप्रिलला होणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की यंदाच्या शब ए बारातला तुम्ही घरातच थांबा. हयात नसलेल्यांना घरातच स्मरण करा. त्यानंतर ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला. त्यामुळे यंदा फुलेंची जयंती ही ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून साजरी करा. १४  एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यावर्षी आपण ‘एक दिवस संविधानासाठी’ लावून जयंती साजरी करुया.”

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here