जिल्ह्यातील १४ निवारागृहांमध्ये राज्यातील २०३ परराज्यातील ४९६ : जिल्हाधिकारी

0
39

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील १४ निवारागृहांमध्ये राज्यातील २०३ आणि परराज्यातील ४९६ अशा एकूण ६९९ जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील २१ परराज्यातील ५ अशा २६ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे. रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील १६ परराज्यातील ८ अशा २४ जणांचा समावेश असून याची क्षमता ५०  जणांची आहे. 

करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी  येथे राज्यातील २ परराज्यातील ३५  एकूण ३७ जण असून क्षमता ७० जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी – राज्यातील ८  एकूण क्षमता ५० जणांची आहे. कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील ३ परराज्यातील ९७ एकूण १००  जण असून  क्षमता ११३  जणांची आहे.  जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील ३ परराज्यातील ४४ असे एकूण ४७  जण असून क्षमता ५०  जणांची आहे.

हातकणंगले-घुगरे सर यांचे  निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील ७७  जण असून क्षमता १०० जणांची आहे.  अशोकराव माने ग्रुप  वाठार तर्फ वडगाव राज्यातील २  परराज्यातील १०७  असे एकूण १०९  जण असून क्षमता ११५  जणांची आहे. शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील ४३   परराज्यातील ८  एकूण ५१  जण असून क्षमता ५५  जणांची आहे.  राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील ६४  जण असून क्षमता ७०  जणांची आहे.शिरोळ- शाळा क्रमांक १  जयसिंगपूर येथे राज्यातील १३  परराज्यातील १७  असे एकूण ३०  क्षमता २५  आहे. गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील १०  परराज्यातील १  एकूण ११  असून क्षमता २४   जणांची आहे. गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील १३   जण असून क्षमता २०  जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील ५  परराज्यातील ९७  असे एकूण १०२ असून क्षमता १०५  जणांची आहे.

यामध्ये तामिळनाडूमधील १९५ , कर्नाटकातील १९१ , राजस्थानमधील ६२ , उत्तरप्रदेश मधील २९ , मध्यप्रदेशमधील १० , पाँडेचरी मधील २ , पश्चिम बंगालमधील १ , केरळमधील ५ , बिहार १  अशा एकूण ९  राज्यातील ४९६  जणांचा तसेच महाराष्ट्रातील २०३  असे मिळून ६९९  व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here