सिध्दनेर्लीत सौर ऊर्जा पॅनेलची चोरी

सिध्दनेर्ली : सिध्दनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामंपंचायतीमार्फत साजणे वसाहतीमध्ये बसवलेले अंदाजे 30 ते 35 हजार रुपये किमंतीचे सौर ऊर्जा पॅनेल चोरट्यांनी लंपास केले.


याबाबत समजलेली माहिती अशी, सिध्दनेर्ली ग्रामंपचायतीने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दलित वस्ती योजनेतून गावातील वाडीवस्ती तसेच स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन सौर ऊर्जा स्ट्रीट लाईटचे पोल उभे केले होते. या पोलवरील स्ट्रीट लाईटचे पॅनल बोर्ड चोरटयांनी रात्रीत लंपास केले आहेत, तर काही पोल वाकवुन ठेवुन त्यांना दगडाचा आधार देवुन ठेवला आहे, जेणेकरून रात्री पोल वाकवुन परत राहिलेल्या पॅनल बोर्ङची चोरी करता येईल. पोल वरचेवर लावलेने ते चोरट्यांना सहजपणे वाकवता आले व चोरी करता आली. अंदाजे 30ते 35 हजारांचे साहित्य चोरून नेले असुन सर्व पोल वाकवुन लाखो रूपयांचे नुकसान केले आहे. चोरीबाबत कागल पोलिस ठाण्यात ग्रामपंचायतीने फिर्याद दिली आहे.