पुण्यात कोरोनाचा पहिला बळी…!

0
60

पुणे (प्रतिनिधी) :  पुण्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात ५२ वर्षाच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता १०२४  वर पोहोचली आहे तर आतापर्यंत देशभरात २८  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील ८  मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. आतापर्यंत ९६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here