किरीट सोमय्या पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये; उद्या करणार १०० कोटींचा घोटाळा उघड

मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना टार्गेट करत त्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. कोरोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक विक्रम केला, उद्या मुंबई महापालिकेतील १०० कोटींचा घोटाळा उघड करणार असल्याचा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, मंत्र्यांच्या परिचित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या कंपनीला मुंबई महानगरपालिकेत कोरोनाच्या काळात कशा पद्धतीने १०० कोटीचे कंत्राट मिळाले, हे उद्या जनतेसमोर ठेवणार आहे. त्यानंतर पुढच्या महिनाभरात एमएमआर रिजनमधील महापालिकांमधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांमधील पार्टनरशिपचे आणखी पाच घोटाळे उघडे करणार, असंही ते म्हणाले.

यावेळी सोमय्यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या प्रकरणावरही भाष्य केले. नवाब मलिका यांनी शेअर केलेल्या समीर वानखेडेंच्या जन्मदाखल्याचे कोणतेही पुरावे मुंबई महापालिकेकडे नाहीत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी महितीच्या अधिकारात दिली आहे. आता समीर वानखेडेचे जन्मदाखल्याचे गूढ रहस्य मुंबईच्या महापौर, नवाब मलिक आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी जनतेसमोर ठेवावे, असंही सोमय्या म्हणाले.