पुण्यातील कंपनीला मिळाली कोरोना व्हायरस टेस्ट किटची परवानगी !

0
95

पुणे : देशात रोज होणाऱ्या कोरोना चाचणीचं प्रमाण काहीशे मध्ये आहे. हे प्रमाण आता वाढणार आहे. कारण, कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेली किट्स बनवण्याचं काम पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबॉरेटरीमध्ये सुरू आहे. जगभरात अशी कीट्स बनवण्याची परवानगी नऊ कंपन्यांना आहे. त्यामध्ये भारतातील या एकमेव कंपनीचा समावेश आहे. या कंपनीकडून आत्ता दररोज दहा हजार किट्स बनवले जातायत. तर शनिवारनंतर त्यामध्ये वाढ करून दररोज पंचवीस हजार किट्स तयार करण्यात येणार आहेत.

या किट्सची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या किट्सच्या तुलनेत कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीकडून या किट्सचा पुरवठा सुरुवातीला फक्त सरकारच्या आरोग्य विभागालाच करण्यात येणार आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल आणि कार्यकारी संचाकलक शैलेंद्र कवाडे आणि वितरण विभागाचे प्रमुख राहुल पाटील यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here