राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १२२ वर !

0
33

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात आणखी 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये 5 आणि ठाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. दिवसभरात राज्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 15 रुग्ण आढळून आलेत. सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं.राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. ‘जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका,’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here