ओरिसा सरकार देणार कोरोनावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ४ महिने advance पगार !

0
26

भुवनेश्वर : देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. देशातल्या सरकारी हॉस्पिटल्समधले सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस सध्या या व्हायरसविरुद्ध लढत आहेत. कोरोना पेशंट्सवर उपचार करताना या डॉक्टर्स आणिन नर्सेसना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. मात्र कर्तव्य असल्याने सर्व डॉक्टर्स प्रयत्नांची शर्थ करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओरिसा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अशा सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचं वेतन Advance म्हणून देण्यात येणार आहे. असा निर्णय घेणारं ओरिसा हे पहिलच राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन घोषणेनंतर तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देऊ असा इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here