२१ दिवस घरी नाही रहाल तर होईल महिनाभर जेल !

0
37

मुंबई :देशभरात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पण काही लोक सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत, घराच्या बाहेर विनाकारण फिरायला जातात यांना चाप लावण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.
विनाकारण घराच्या बाहेर तुम्ही फिरत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास एक महिन्यापासून २ वर्ष जेलची शिक्षा होईल. त्याचसोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी लोकांना कडक शब्दात इशारा दिला आहे. लोकांनी अशी परिस्थिती बनवू नये जेणेकरुन गाळीबार करावा लागू शकतो असं त्यांनी बजावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रुप पेठ वडगावची पोस्ट २१ दिवसांचा लॉकडाऊन दरम्यान जर कोणी नियम आणि सूचनांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर आपत्कालीन कायदा कलम ५१ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये शिक्षा आणि दंड दोन्ही होणार आहे. लॉकडाऊन न पाळल्याने २०० रुपये दंड आणि १ महिना जेल अशी शिक्षा आहे. पण यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर दंगलपरिस्थितीत ६ महिने जेलची शिक्षा वाढू शकते. तसेच जर तुम्ही नियमांचे पालन करत नसाल अन् तुमच्यामुळे इतरांच्या जीवाला धोका पोहचत असेल तर तुम्हाला २ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here