राज्यातील 15 पॉझिटिव्ह रुग्ण झाले कोरोनामुक्त !

0
80

प्रतिनिधी:
डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील विविध रुग्णालयातील 15 रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत.या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सामान्यांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.राज्यात आज कोरोनाबाधितांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत.गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या 15 रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here