कोरोनोच्या नावाखाली ग्रामीण भागात नुसत्या रस्सा पार्ट्या…!

0
842

गडहिंग्लज (नितीन मोरे): कोरोनोच्या रोगाच्या भितीने संपूर्ण जग भयभीत झालं असताना गडहिंग्लज तालुक्यातील काही खेडे गावातून मात्र रस्सा पार्ट्यांना ऊत आला आहे. मुंबई पुणे आणि इतर ठिकाणी काम करणारे आपल्या भागातील अनेकजण गावी आलेले आहेत.

गावाकडे आल्यानंतर दक्षता घेण्याऐवजी पै-पाहुण्यांच्या गाटीभेटी घेत गावातील मित्र मंडळीं बरोबर रस्सा पार्टी आणि गप्पा-टप्पात रमले आहेत. अशाच  पार्ट्या होत गेल्या आणि बाहेरून आलेल्या कोणाकडून कोरोनोचा संसर्ग झाला तर आपण खेडी वाचवु शकणार नाही. गड्या शहरापेक्षा आपला  गाव बर म्हणत ग्रुपने एकत्रीत येऊन संसर्ग पसरविण्या सारखा मोठा गुन्हा ही मंडळी करीत आहेत.प्रशासनाने याची वेळीच दखल घेवून अशा चाकरमान्यांना लगाम घालणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसापासून कोरोनोच्या पार्श्वभूमीवर आपले सरकार आणि प्रशासन दक्ष राहून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालत कोरोनोवर मात करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. याउलट मुंबई, पुणे व इतरत्र सरकारी आणि खाजगी काम करणाऱ्यांना सुट्या जाहिर केल्यानंतर गावाकडे आलेले, शिकली-सवरलेली लोक मात्र गाफिल पणाने वागत आहेत. गावात आल्यानंतर स्वतः लाच आचारसंहिता लागू करून घेवून स्वतः घरामध्ये राहण्यापेक्षा गावातील मित्र मंडळीना एकत्रीत करून रस्सा पार्ट्या आणि गप्पा-टप्पा मारत एंजॉय करणे सुरु आहे. जगभरात आजवर लाखोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढवळून येत आहेत. त्यापैकी काहीजण कोरोनोमुळे मृत्युमुखी पडले आहेत. तरी ग्रामीण भागात त्याचा काही परिणाम झाला नसल्याचे जाणवते. स्वतः साठी नसेना का पण आपल्या परिवारासाठी या मंडळीनी क्षणीक सूखाचा त्याग करायला हवा पण या मंडळींना हे सांगणार कोण? प्रशासनानेच अशा चाकरमान्यांना लगाम घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here