गडहिंग्लजच्या मुगळी परिसरात गव्यांचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

0
399

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी परिसरातील हिरण्यकेशी नदिकाठी पोहायला गेलेल्या मुलांना चार गव्यांचा कळपाचे दर्शन घडले. परिसरातील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच हा गव्यांचा कळप गावात नदिकाठच्या बाजूने घुसु नये म्हणून त्यांनी या गव्यांच्या कळपाला हाकलवुन लावले. या गव्यांच्या कळपातील चार पैकी दोन गवे निलजीच्या बाजूने तर दोन जरळीच्या बाजुने निघून गेले. गावच्या सरपंचांनी ही माहिती वनखात्याला दिली.

त्यानंतर वनपाल अशोक कोरवी, वनरक्षक कृष्णा ढेळेकर, नागेश खोराटे,  रणजीत पाटील यांनी मुगळी परिसरात येऊन पाहणी केली. गव्यांचा कळप निलजी आणि जरळीच्या बाजूने गेला असल्याने त्यांना दिसून आला नाही.  वनखात्यामार्फत मुगळी आणि पंचक्रोशीतील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असून आजू बाजूच्या गावात गवे दिसून आल्यास वनखात्यास संपर्क करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र गव्यांच्या कळपाने मुगळी येथील हिरण्यकेशीच्या परिसरातील मक्याच्या व उसाच्या शेताचे नुकसान केल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. मुगळी आणि पंचक्रोशीत गव्यांचा कळप राहिला तर आणखी नुकसान होऊ शकते. तसेच गव्यांच्या कळपाकडून मानवी वस्तीत घुसून हल्ला होऊ शकतो त्यामुळे वनखात्याने गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here