परदेशी प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा : सतेज पाटील

0
25

कोल्हापूर (प्रतिनिधी): परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवारी) प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, तपासणी नाक्यांवर तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची काटेकोर तपासणी करा. सर्वांनी सतर्क राहून जबाबदारी पूर्ण करावी. ज्यांना घरीच अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांची तपासणी करा. सीपीआरमध्ये येणाऱ्या प्रवाशांची सविस्तर माहिती घेवून त्यांची तपासणी करावी. अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी वेळोवेळी येथील कक्षाला भेट देवून माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य‍ चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here