‘यासाठी’ मिळणार महिनाभर मोफत इंटरनेट….!

0
55

मुंबई (प्रतिनिधी): कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारनं वर्क फ्रॉम होमचं आवाहन केल आहे. कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आता अनेक व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था समोर येत आहेत. सध्या राज्यात अनेक खासगी कंपन्यांना घरुन काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना परवानगी द्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलंय.

हे आवाहन लक्षात घेता, मुंबईतील केबल चालकांवर आता लोकांना घरी थांबवण्याची जबाबदारी असल्याची भावना समजून घेत, शिव केबल सेनेच्या माध्यमातून या परिस्थितीत लोकांना मोफत इंटरनेट सेवा पुरवण्याचं आवाहन सर्व केबल चालकांना करण्यात आलंय. नवं इंटरनेट कनेक्शन घेणाऱ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं घरी राहू शकतील. याची माहिती शिवकेबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here