मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार कोसळलं; ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी

0
80

भोपाळ (वृत्तसंस्था) : अखेर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री कलमनाथ यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवारी) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. मात्र पुरेसं संख्याबळ नसल्याने बहुमत चाचणीआधीच कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचं सरकार कोसळलं.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत आज सायंकाळी ५  वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here