‘नमो’ सरकारचा मोठा निर्णय ; जगासाठी देशाचे दरवाजे ‘बंद’

0
171

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): येत्या २२ मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

याशिवाय केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी काही निर्बंध घालण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेत रुग्ण आणि विद्यार्थ्यांशिवाय इतर कुणालाही सवलतीच्या दरात प्रवास करू दिला जाणार नाही. शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे आणि बसप्रवास टाळावा यासाठी हा नियम बदलण्यात आला आहे. वयाच्या ६५  वर्षांवरील नागरिकांनी आणि १० वर्षांखालील मुलांनी अत्यंत गरजेचं असल्याशिवाय घराबाहेर पडू नये,असं सांगण्यात आलं आहे.

बी आणि सी श्रेणीच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी एकाआड एक आठवडा कामावर यावं आणि कार्यालयीन उपस्थिती शक्य तितकी कमी राहावी यासाठी प्रयत्न करावेत, असंही केंद्र सरकारने कळवलं आहे.फक्त कोरोनाप्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे.दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here